Maharashtra Rain Updates :  राज्यात पावसाने दडी मारल्यानंतर शुक्रवारपासून वरुणराजाने दमदार एण्ट्री मारली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. तर विकेंडला पाऊस कोसळत असल्याने सहलीला फिरायला जाणारे मंडळी आनंदात आहे. पण सहलीला जाण्यापूर्वी हवामान विभागाने पावसाचा अंदाज काय सांगितला आहे ते जाणून घ्या. मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक ठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. (maharashtra heavy rainfall warning to mumbai pune konkan vidarbha 26 districts weather update alerts in marathi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  



पुढील तीन दिवसांसाठी महाराष्ट्राला (Maharashtra Monsoon) यलो अलर्ट देण्यात आला असून हवामान विभागाने 17 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (IMD Predict Yellow Alert In Maharashtra)