पुणे : Rain in Maharashtra : राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे 15 जिल्ह्यात 1.36 लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या संकटाचे पंचनामे करण्यात आलेत. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात नुकसान मोठे झाले आहे. तसा अहवाल कृषी आयुक्तांनी राज्य सरकारला सादर केला आहे. ( Heavy rains hit 1.36 lakh hectares in 15 districts in Maharashtra )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम महाराष्ट्रातील  सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. भाजीपाला, कडधान्य, गहू, ज्वारी, हरभरा, मका, ऊस, द्राक्ष, डाळींब या पिकाला मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यांत झाले आहे. 



राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 1 लाख 36 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेत. आता नुकसान भरपाई कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी पाच, उत्तर महाराष्ट्रातील चार, तर मराठवाड्यातील एका जिल्ह्याचा समावेश आहे.