मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. कोकण भागातही चांगला पाऊस कोसळत आहे. विशेत: मराठवाड्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे नांदेडमधील पाणीटंचाईचे सावट दूर झाले आहे. येथील धरण पूर्णपणे भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर परभणीत पाऊस पडल्याने पिकांना जिवदान मिळाले आहे. त्यामुळे बळीराजा खुशीत आहे. तर हिंगोली जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असून सेनगाव शहरात दमदार पावसाने हजेरी लावली.


चांगला पाऊस, धरण भरले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडकरांवरील पाणीटंचाईचे विघ्न दूर झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासुन जिल्ह्यात आणि विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाउस झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे. अजुनही पाण्याची आवक सुरु असल्याने विष्नुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्यावरच्या बाजुला देखील मोठा पाउस झाला.


हिंगोलीत पावसाचा तडाखा


परभणी जिल्ह्यातून वीस दिवसांपासून गायब झालेल्या पावसानं हजेरी लावल्यानं, शेवटच्या घटका मोजत असलेल्या पिकांना जिवनदान मिळाले. मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्याला पावसाचा तडाखा बसला. या परिसरातल्या मुसळधार पावसानं शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तर परभणी जिल्ह्यातल्या पालम इथल्या लेंढी नदीच्या पुरावरून पाणी वाहिल्याने गोदावरी नदीपात्राकडल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 


पोलीस ठाण्यात पाणी शिरले


गायब झालेला पाऊस दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात सक्रिय झालाय, सेनगाव शहरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सेनगाव पोलीस ठाण्यात पाणी शिरले. परिणामी पोलिसांना पाण्यातून ये जा करावी लागत आहे. सेनगाव शहरांत सांडपाण्याचे व्यवस्थापन खोळंबल्याने नालीतून वाहून जाणारं पाणी सेनगाव पोलीस ठाण्यात घुसले आहे. त्यामुळे पोलिसांनी एकच तारांबळ उडाली.