महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी विक्रमी वाढ
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी विक्रमी वाढ झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी विक्रमी वाढ झाली आहे. आज एका दिवसामध्ये राज्यात कोरोनाचे ३,८७० नवे रुग्ण आढळले, तर आज १०१ जणांचा मृत्यू झाला. राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १,३२,०७५ एवढा झाला आहेत, तर आत्तापर्यंत ६,१७० जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाच्या १,५९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोरोनाचे ६०,१४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६५,७४४ जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये मागच्या २४ तासात ४१ जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३,६७१ एवढी झाली आहे. तर मुंबईमध्ये ६६,४८८ एकूण रुग्ण आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४९.७८ टक्के एवढं आहे, तर मृत्यूदर हा ४.६७ टक्के एवढा आहे. तर आजपर्यंत केलेल्या ७,७३,८६५ नमुन्यांपैकी १,३२,०७५ नमुने म्हणजेच १७.०६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.