मुंबई : महाराष्ट्रातील एका आमदाराचा आज साखरपुडा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या हालचालींमध्ये आमदाराचा साखरपुडा पार पडतोय. दुसरीकडे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी (Floor Test) एक एक आमदाराचं मत महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी साखरपुडा उरकताच हे आमदार साहेब त्वरित अधिवेशनाला मुंबईसाठी रवाना होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा आज साखरपुडा पार पडला. (Devendra Bhuyar Engagement) देवेंद्र भुयार यांच्यावर संजय राऊत यांनी संशय घेतला होता. त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आमदार देवेंद्र भुयार हे चर्चेत आले होते. आज देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा होत असून राज्यातील स्थिती पाहता ते लगेचच मुंबईसाठी रवाना होणार आहेत.


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आता महाविकासआघाडीचं भवितव्य उद्याच्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये ठरणार आहे. एकनाथ शिंदे जवळपास 50 आमदारांसह बंज करत राज्याबाहेर आहेत. उद्या ते मुंबईत येण्याची शक्यता आहे.


एक एक आमदाराच्या मताला महत्त्व आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनसेच्या एकमेव आमदाराचं मत आपल्याला मिळावं म्हणून राज ठाकरे यांना फोन करुन चर्चा केली. मनसेने देखील भाजपला पाठिंबा देणार असल्याचं मान्य केलंय.


राज्यातील राजकीय स्थिती पाहता प्रत्येक व्यक्तीला पुढे काय होणार याबाबत उत्सूकता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर कायम राहणार की त्यांना खूर्ची सोडावी लागणार याचा निर्णय काही तासांमध्ये होणार आहे.