Maharashtra Karnataka Border Issue : विरोधकांकडून सरकारची कोंडी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज ठराव?
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute Issue : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सरकार ठराव मांडणार आहे. ( Maharashtra Karnataka Border ) सीमावादाबाबत काल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सरकारची कोंडी झाली. (Maharashtra Marathi News) महाराष्ट्राला (Maharashtra) इंचभरही जमीन देणार नाही असा ठराव कर्नाटक विधानसभेने गेल्या आठवड्यात एकमताने मंजूर केल्यावर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. (Maharashtra Political News)
महाराष्ट्र (Maharashtra) सरकारनेही तातडीने कर्नाटक (Karnataka) विरोधी प्रस्ताव आणावा अशी मागणी केली जात होती. मात्र शिंदे फडणवीस सरकारने आठवडाभर सावध भूमिका घेतली होती. काल विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा मुद्दा लावून धरला. अखेर आज सरकारतर्फे सीमावादावर ठराव येणार आहे. दरम्यान न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत तो प्रदेश सरकारने केंद्रशासीत करावा, अशी मागणी या ठरावात असावी, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत म्हटले आहे. तर कोणत्याही परिस्थितीत सीमाप्रश्नावर राज्य ससरकार तसूभरही मागे हटणार नाही, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अधिक भर घातल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. (Maharashtra Karnataka border dispute ) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. (Maharashtra Political) कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याप्रकरणी अमित शाह यांची भेट घेतली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा आडमुठेपणा कायम दिसत आहे. कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही. तसेच या प्रकरणी कोणतीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
कर्नाटक सीमा वादावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वार पलटवार सुरु झाले आहेत. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही, नेताच नाही, अशी अवस्था आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना केला.
दरम्यान, काल कर्नाटक सीमावादप्रकरणी (Maharashtra Karnataka Border Dispute) उद्धव ठाकरे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad) थेट पेन ड्राईव्हच (Pen Drive) सादर केला. सीमावादावरच्या प्रश्नासंदर्भातली चित्रफित असणारा हा पेन ड्राईव्ह आहे. या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे आहेत. यातील फिल्म सर्व आमदारांना दाखवावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.