राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू
कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. (Maharashtra Lockdown till February 31 Thackeray government Decision) राज्यातील लॉकडाऊन 31जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यात पुन्हा कालावधी वाढविण्यात आला आहे.
या सूचना बंधनकारक
- सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक
- सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक
- साबणाने सतत हात धुणे आवश्यक
नव्या स्ट्रेनमुळे लॉकडाऊनमध्ये वाढ
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे तीन प्रकार समोर आले होते. जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. राज्यातही नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
उपहारगृहे, दुकानांसाठी वेळा
मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आता कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारकडून आज शुक्रवारी लॉकडाऊन वाढविण्याबाबत आदेश जारी केला आहे. कोरोनाच्या (Corona) जीवघेण्या फैलावामुळे महाराष्ट्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत लॉकडाउन (Lockdown) वाढवण्यात आला होता. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार कायम असणार आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा हा निर्णय घेतला आहे.