मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कमी झालेले नाही. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असताना जगभरात तिसरी लाट आली. सुरुवातीला 144 देशात ही लाट आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात कोरोना लसीकरणाचा विक्रम नोंदवला गेला आहे. दोन वेळा कोरोना लसीचे डोस घेतल्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. तसेच कोरोनाचा उद्रेकात घट झाल्याने आता राज्यातील लॉकडाऊन निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता आहे. तसे संकेत सरकारकडून मिळत आहेत. दरम्यान, मुंबई लोकलबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. दुकानांच्यावेळात बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर ओसरत झाल्यानंतर बहुतेक राज्यांमध्ये अनलॉक सुरू झाले आहे. जरी अशी काही राज्ये आहेत जिथे निर्बंध शिथिल केले गेलेले नाहीत. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात (Maharashtra Lockdown Updates) दररोजच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे. हे लक्षात घेता, कोरोना प्रकरणांवर लक्ष ठेवणाऱ्या राज्याच्या सल्लागारांनी निर्बंधांमध्ये शिथिल करण्याची शिफारस केली आहे.


कोविड -19 मॅनेजमेंटचे राज्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, कोरोना रुग्णसंख्या कमी कमी झाली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ला साळुंखे यांनी सांगितले की, या आस्थापनांमध्ये काम करणाऱ्यांना लसीकरण करण्यावर भर दिल्यास दुकानांच्या वेळ संध्याकाळी चार वाजेपासून पुढे वाढविण्यात येऊ शकते. 


त्याआधी,  आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, कमी साप्ताहिक पॉझिटिव्ह असणाऱ्या जिल्ह्यांना येत्या आठवड्यात लॉकडाऊन सारख्या निर्बंधातून सूट मिळू शकते. तथापि, त्यांनी हे स्पष्ट केले आहे की अपवाद केवळ कमी मृत्यू दर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि 0.1 ते 0.2 टक्के पर्यंतचा पॉझिटिव्ह दर असणाऱ्या जिल्ह्यांचा असेल.


त्याचवेळी, सामान्य लोकांसाठी (Mumbai Local News) स्थानिक गाड्यांच्या सेवा पुन्हा सुरु करण्यासंदर्भात विचारले असता कोविड टास्क फोर्सच्या सदस्याने सांगितले की ज्यांना संपूर्ण लस दिली आहे, त्यांना लोकलचा प्रवास करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. ते म्हणाले, कोव्हीड -19च्या कठोर मार्गदर्शक सूचनांसह उपनगरी सेवा हळूहळू सुरु केल्या जाऊ शकतात.


यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा (Local Train)पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते. विशेषत: अशा लोकांसाठी ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांच्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. महाराष्ट्रातील महा विकास आघाडी (MVA)सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोनव्हायरस निर्बंधामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केली.


त्याचबरोबर, बीएमसीने असेही म्हटले होते की, अनलॉकिंगच्या दुसऱ्या टप्प्यातकोविड -19 चे पूर्णपणे लसीकरण करणार्‍यांना स्थानिक गाड्यांमध्ये निर्बंध कमी करण्याचा विचार आहे.


दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 4,877 नवीन रुग्ण आढळले आणि 53 लोकांचा मृत्यू. फेब्रुवारीनंतरची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. राज्यात सध्या पॉझिव्हिटी दर 3.29 टक्के आहे आणि 88,729 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र राज्याचा रिकव्हरी रेट 96.43 टक्के आहे.