सातारा : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारी थंडीची लाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रालाही गारठवून सोडताना दिसत आहे. राज्यात मुंबईसह बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच खाली गेलेला दिसत आहे. मुख्य म्हणजे थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळख असणाऱ्या माथेरान आणि महाबळेश्वर या गिरीस्थानांपेक्षाही अधिक थंडी राज्यातील इतर काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. (Mahabaleshwar Temprature)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निफाडचं तापमान हे महाबळेश्वरपेक्षाही खाली आलं आहे. ज्यामुळं इथे दिवस काहीसा उशिरानं सुरु होताना दिसत आहे. 



निफाडमध्ये पारा 4.5 अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे, ज्यामुळं तिथे असणाऱ्या नागरिकांनाही काही अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 


पाकिस्तानमधील धुळीच्या वादळानं अरबी समुद्रातून राज्यात प्रवेश केला आणि परिणामी राज्याचं तापमान कमी होई लागलं. तिथून उत्तरेकडून होणारा बोचऱ्या वाऱ्याचा माराही सुरुच. 


ज्यामुखं सबंध महाराष्ट्र सध्या गारठला आहे. द्राक्ष, कांदा यांसारख्या पिकांवर अधिक थंडीचा मारा झाल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे. परिणामी निर्यातीवर थेट आघात झालेला दिसेल. 


महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची ये-जा सुरु 


साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिलवशी तापमानाचा पारा खाली आला आहे. 6.5 वरुन येथील तापमान आणखी खाली उतरलं आहे. 


सलग दुसऱ्या दिवशी हवामानात झालेल्या या बदलामुळे आणि पर्यटन स्थळांवरील बंदी शिथिल केल्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी या भागात पर्यटकांची ये- जा सुरु आहे. 


पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरामध्ये विविध रिसॉर्ट, विविध पॉईंट्सवर सध्या ठिकठिकाणहून आलेल्यांची वर्दळ दिसत आहे.