वाढीव वीज बिलाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर तर भिवंडीत मनसेचा राडा
राज्य सरकारने तसेत महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मनसेकडून (MNS`s Rada in Bhiwandi ) टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
कोल्हापूर / भिवंडी : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन काळात भरमसाठ वीज बिले आलीत. ही वाढीव बिले रद्द करावी अथवा कमी करावीत, अशी मागणी राज्यातून वीज ग्राहकांकडून करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने तसेत महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे वाढीव वीज बिलांविरोधात कोल्हापूरकरांचा वाहन मोर्चा काढल (Kolhapur against increased electricity bill) आपला संताप व्यक्त केला तर तर भिवंडीत मनसेकडून (MNS's Rada in Bhiwandi ) टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मनसेचा जोरदार राडा
भिवंडीला वीज पुरवठा करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयावर मनसेने हल्ला केला. भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी कार्यकर्त्यांसह वाढीव वीज बिल संदर्भात चर्चेसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना अडवल्यामुळे त्यांनी हल्ला केला. प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. शहरातल्या खंडू पाडा आणि अंजुरफाटा इथल्या कार्यालयावर मनसेने हल्ला केला.
कोल्हापूरकर आक्रमक
वीज बिल माफीसाठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले दिसून आलेत. शहरात भव्य वाहन मोर्चा काढला. मोटारसायकल, रिक्षा, ट्रक, इतर वाहने मोर्चात सहभागी झालेली दिसून आलीत. लॉकडाऊनच्या काळातलं वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयाला नागरिकांचा घेराव घातला.
राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावं यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकदा आक्रमक झालेत. राज्य सरकारने वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरातून भव्य वाहन मोर्चा काढण्यात आला. राज्य इरिगेशन फेडरेशन आणि आम्ही वीज बिल भरणार नाही, असे सांगत कृती समितीच्यावतीने ही रॅली काढण्यात आली. हा मोर्चाचा दसरा चौक इथून निघाला.