मुंबई : महाराष्ट्रात एका दिवसात पुन्हा एकदा कोरोनाचे ९ हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. मागच्या २४ तासांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९,२५१ ने वाढली आहे, तर २५७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या एका दिवसात ७,२२७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २,०७,१९४ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५६.५५ टक्के एवढं झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात २५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातला सध्याचा मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३,६६,३६८ एवढी झाली आहे. यापैकी १,४५,४८१ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १३,३८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


राज्यात आजही मुंबईपेक्षा पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये एका दिवसात १,०८० कोरोना रुग्ण आढळले आहेत, यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १,०८,०६० एवढी झाली आहे. तर ५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतल्या एकूण मृत्यूंची संख्या ६,०३६ एवढी झाली आहे. 


पुण्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १,९१३ रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४९,३७० एवढा झाला आहे. पुण्यामध्ये एका दिवसात ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात एकूण मृत्यूंची संख्या १,२४८ एवढी झाली आहे.