औरंगाबाद : राज्यात आरोग्य विभाग भरती परीक्षाच्या पेपरफुटीनंतर म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आला. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पेपर फुटीवरुन काय म्हणाले?
राज्यात पेपर फुटण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा पेपर फुटले आहेत.  पेपर फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही. सरकार म्हणून वचक नाही. तसंच पेपर फोडणारे फुटत नाहीत' अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभाग, म्हाडा यासारख्या विविध परीक्षांचे पेपर फुटले. यामुळे परीक्षार्थींमध्ये संतापाचं वातावरण आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपलं परखड मत मांडलं.



निवडणुकीसाठी बाहेर पडलो नाही
आपल्या देशात निवडणुका येतच राहतात, त्यामुळे निवडुकीसाठी बाहेर पडलो असं नाही, कोरोनानंतर बाहेर पडलो आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबादची निवडणुक वर्षभर पुढे ढकलण्यात आली, आता फेब्रुवारीत तारखेनुसार निवडणुका होतील असं वाटत नाही, ज्या निवडणुका आहेत, त्या होतील की नाही याची खात्री नाहीए. त्यामुळेच ओबीसी आरक्षणाचं नवं प्रकरण सुरु केलं आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.


पेपरफुटीप्रकरणी अटकसत्र
दरम्यान, म्हाडा पेपर फुटी प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखीन तीन जणांना अटक केली जाणार आहे.  सर्वांच्या घराची झाडाझडती घेतली आहे.  आरोपी आपापसात कोडवर्ड मध्ये बोलत असल्याचं तपासात समोर आलं असून मोबाईलवर संभाषण करताना कोडवर्ड च्या भाषेत बोलायचे. तसंच तपासात आणखीन काही पेन ड्राईव्ह सापडले आहेत.  प्राथमिक तपासात एका विद्यार्थ्यांकडून 12 ते 13 लाख घेतल्याचं समोर, मात्र वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या रक्कम ठरली असल्याची शक्यता आहे.