SC Hearing on Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील शिंदे सरकारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? 16 आमदार अपत्रा ठरले तर काय होईल. याचा सरकारवर किती परिणाम होणार? 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी आघाडी सरकारच्या पतनास कारणीभूत असलेल्या राज्यातील राजकीय संकटाशी संबंधित याचिकांवर निकाल देणार आहे. घटनापीठात न्यायमूर्ती एम.आर. शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांचाही समावेश आहे. संबंधित याचिकांवर सुनावणी पूर्ण करुन खंडपीठाने 16 मार्च 2023 रोजी निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणातील अंतिम सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी सुरु झाली आणि 9 दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला. सर्वोच्च न्यायालय हा निकाल आज देणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाने, सुनावणीच्या शेवटच्या दिवशी, तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिला होता. सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाने कोर्टाला 2016 च्या निर्णयाप्रमाणेच त्यांचे सरकार पुन्हा स्थापित करण्याची विनंती केली होती. ज्याने अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांचे सरकार पुन्हा सत्तेत आले होते.


ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत आणि अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी बाजू मांडली, तर एकनाथ शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल, हरिश साळवे आणि महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प सिंग यांनी प्रताप यांनी मांडली. राज्यपाल कार्यालयातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हजर झाले. विशेष म्हणजे, 17 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित याचिका सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची विनंती फेटाळली होती.


आमदार अपात्र ठरले तर काय?


सर्वोच्च न्यायालचा निर्णय शिंदे सरकारच्या विरोधात गेल्यास त्यांच्यासाठी संकट उभे राहणार आहे. 16 आमदार अपात्र ठरल्यास विधानसभेचे नवे समीकरण कसे असेल?


महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागा आहेत. 16 आमदार अपात्र ठरले तर ही संख्या 272 राहील. या प्रकरणात, बहुमताचा आकडा 137 असेल. सध्याच्या सरकारचे संख्याबळ 165 आहे. 16 आमदार गेल्यानंतर ही संख्या 149 पर्यंत वाढेल (शिंदे गटातील उर्वरित 24 आमदारांनीही फडणवीस यांना पाठिंबा दिला तर).


यानंतर उर्वरित 24 आमदारही उद्धव यांच्याकडे परतले तर सरकार अल्पमतात येऊ शकते. अशा स्थितीत शिंदे गटाकडे केवळ 125 आमदार उरणार आहेत. अशा स्थितीत भविष्यात फ्लोअर टेस्टची परिस्थिती निर्माण झाली तर सरकारमध्ये राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या आकड्यांवर भाजपची नजर असेल. विशेषत: अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर. 


गेल्यावर्षी जूनमध्ये शिंदे आणि 39 आमदारांनी अविभाजित शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात बंड केले, ज्यामुळे पक्ष फुटला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार पडले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत युती करुन राज्यात सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होता.