Thane : ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर (Illegal Pubs, Bars) कठोर कारवाई करावी. तसंच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर (Bulldozer) फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekant Shinde) यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात काही तरुण-तरुणी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना तिथली अमली पदार्थांशी संबंधित अनधिकृत बांधकामे बुलडोझर लावून नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे शहरामध्ये यासंदर्भात व्यापक कारवाया करण्यात आल्या. आता तशाच पद्धतीने ठाणे शहर आणि मीरा-भाईंदर शहरातील अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामे ही बुलडोझर लावून नष्ट करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.


अमली पदार्थामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होत आहे. हा विळखा तातडीने रोखणे महत्त्वाचे आहे. यासाठी अत्यंत कडक उपाय योजण्यात यावेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरु करावी. शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.


अल्पवयीन मुलांचा सहभाग
पुण्यातील L3 बारमधल्या पार्टीत अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पोलिसांनी cctv फुटेज तपासल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा झालाय. 
बार मधील सोफ्यावर बसून अल्पवयीन मुलगा दारू पितानाचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती आलंय. पुणे गुन्हे शाखेकडून अल्पवयीन मुलाचा शोध सुरू आहे.पार्टीत देण्यात आलेल्या कुपनवरून मुलांची तपासणी सुरू आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आलीय. पार्टीत सहभागी असणाऱ्या सर्व मुलांची पुणे पोलिसांकडून 3 दिवसांपासून चौकशी सुरू आहे. 


सुषमा अंधारे यांचा आरोप
पुणे विद्येचे माहेरघर म्हटलं जात, पण याच पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला आहे. पुण्यात फक्त अधिकृत 23 पब बार आहेत ज्यांच्याकडे परवाना आहे. फक्त, पण यादीत 100 पब बार आहेत. हे कोणाच्या आशिर्वादाने सुरु होते, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. शंभूराजे देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे अशी टीका करत तुम्ही कारवाई केली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे.