चंद्रशेखर भुयार, झी मीडिया,बदलापूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर (Eknath Shinde Rebel) शिवसेनेला (Shiv Sena) लागलेली गळती कायम आहे. शिवसेनेने या बंडानंतर बैठकींचा सपाटा लावलाय. मात्र या बैठका निष्फळ ठरत असल्याचंच सध्या राजकीय घडामोडींवरुन स्पष्ट होतंय. बदलापुरातील सर्वच्या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सेनेला हा जबरदस्त धक्का समजला जातोय. (maharashtra political crisis badlapur shiv sena all corporator join eknath shinde group at present chief minister at nandanwan bunglow)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापुरातील या एकूण 25 नगरसेवकांनी शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवर बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी या नगरसेवकांचं पुष्पगुच्छ देत आपल्या गटात स्वागत केलं. यावेळेस या नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे.


दरम्यान या नगरसेवकांव्यतिरिक्त ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत.