मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून सत्तांतर झालं आहे. आज विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव झाला. या चाचणीमध्ये शिंदे गट आणि भाजपने 164 मतांनी विजय मिळवला. तर महाविकास आघाडीकडे केवळ 99 मतं होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना सर्वांचे आभार मानले. यावेळी ते बोलताना म्हणाले की मी या मतदानासाठी अदृश्यपद्धतीने हातभार लावलेल्यांचेही आभार मानतो. देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर खोचक टीका करत त्यांचे आभार मानले. 


मतदानाला काँग्रेस आणि शिंदे विरोधीगटातील काही मंत्री उशिरा पोहोचल्याने त्यांना विधिमंडळात घेतलं गेलं नाही. मतदानासाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपचा विजय होण्यात त्यांचा अदृश्य हातभार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे बोलताना म्हटलं आहे. 


ज्या सदस्यांनी भाजप-सेना युतीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतं दिली त्यांचे आभार, पण ज्यांनी अप्रत्यक्षपणे म्हणताच विधिमंडळात एकाच हशा पिकला. ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे हा प्रस्ताव पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांची आभार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.