मुंबई : Maharashtra political crisis update :महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ स्थापन केलं आहे. यामध्ये धनंजय चंद्रचूड, एम आर शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी नरसिंहा या न्यायमूर्तींचा समावेश आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी सत्तासंघर्ष सुरुच आहे.दरम्यान, शिंदे गटाने आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा केल्या आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता घटनापीठ काय निर्णय देणार याचीच उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळीत (Chief Justice Uday Lalit) यांनी त्यात स्वतःचा समावेश केलेला नाही. एकनाथ शिंदे सरकारची घटनात्मक वैधता, उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 सदस्यांवर बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले निमंत्रण आणि विधानसभा अध्यक्षांनी निवडीला दिलेले आव्हान, हे सर्व मुद्दे घटनात्मक तरतुदींशी संबंधित असल्याने यावर सखोल सुनावणीची गरज आहे. यासाठी सर्व याचिकांवर घटनापीठापुढे सुनावणी होईल, असेही स्पष्ट केले होते. 


महाराष्ट्रात नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी सत्तासंघर्ष सुरूच आहे. कारण महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 22 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ही सुनावणी मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता होती. मात्र, त्यावेळीही झाली नाही. तारीखवर तारीख पडत असल्याने पुढे काय होणार याचीच उत्सुकता लागली होती. न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी पुन्ह लांबली होती.


सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांच्या निवृत्त झालेत. त्याआधी त्यांनी पाच जणांचे घटापीठ होईल आणि पुढील सुनावणी सुरु होईल, असे स्पष्ट केले होते. आता पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. आता हे घटनापीठ पुढील सुनावणी करणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, शिंदे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी, हरीश साळवे हे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. अरविंद दातार हेही निवडणूक आयोगाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.


 शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर दावा केला असून खरी शिवसेना असल्याचे म्हटले आहे. यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही धाव घेतली आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी होणार आहे. यावर ठाकरे गटाने चिंता व्यक्त केली आहे.