Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे गटात आणखी दोन आमदार दाखल
Maharashtra Political Crisis : अपक्ष आमदार किशोर जोडगेवार आणि आमदार गीता जैन या देखील गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा वाढला आहे.
मुंबई : Maharashtra Political Crisis : अपक्ष आमदार किशोर जोडगेवार आणि आमदार गीता जैन या देखील गुवाहाटी येथील रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा वाढला आहे. त्याआधी शिवसेनेचे आणखी दोन आमदार गुवाहाटीत दाखल झाले आहेत. कृषीमंत्री दादा भुसे आणि माजी मंत्री संजय राठोड हे सूरतमार्गे गुवाहटीमध्ये दाखल झालेत आहेत. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटकही आहेत.
सकाळपासून दादा भुसेंच्या बंगल्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे ते गुवाहाटीकडे निघाल्याची शक्यता वर्तवली जात होती. तर राठोडही नॉट रिचेबल होते. एकनाथ शिंदे गटात आणखी दोन आमदार दाखल झाल्याने आतापर्यंत एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 35 आमदार होते. दादा भुसे आणि संजय राठोड यात सामील झाल्यावर शिंदे गटाकडे शिवसेना आमदारांची संख्या 37 होणार आहे. त्यामुळे दोन तृतांश आमदारांची संख्या पूर्ण होणार आहे. तसंच 9 अपक्ष आमदार असल्याने ही संख्या 46 झाली आहे.
संजय राठोड यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आहे. संजय राठोड यांनी पक्ष सोडू नये, अशी शितल राठोड यांची इच्छा होती. परंतु त्यांचा विरोध असताना राठोड यांनी गुवाहाटी गाठली. तर एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मिलिंदे नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सूरत गेले. त्यांच्यात एक तास चर्चाही झाली. पण यानंतरही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाली नाही. उलट रवींद्र फाटकच गुवाहाटीत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे आणखी दोन आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गटाची ताकद आणखी वाढली आहे.