Congress News : काँग्रेस संदर्भात महत्त्वाची बातमी. काँग्रेस (Congress) स्वबळावर निवडून येऊ शकतो अशी स्थिती महाराष्ट्रात आहे, असं विधान करुन प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी महाविकास आघाडीला (Maha vikas aaghadi ) धक्का दिलाय. ( Maharashtra Political News) एकीकडे आगामी निवडणुका एकत्र लढण्यासंदर्भात कोणतीही अडचण नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणत असताना नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाची भाषा केली आहे. आम्ही जनतेच्या अपेक्षेत खरे उतरु, असे ते म्हणाले.


मराठवाडा, विदर्भासह कोकणातही काँग्रेसचा आमदार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाडा, विदर्भासह कोकणातही काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले. पवार यांच्यासारखे जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आता काँग्रेस संपणार नाही, असं वाटत आहे, असे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीची चर्चा बैठकीत होईल.अमरावती आणि नागपूरची जागा महविकास आघाडी शिक्षण मतदार संघात लढवणार आहोत. आमची तयारी सुरु आहे, असे ते म्हणाले. 


'काँग्रेसमध्ये हुकूमशाही नाही'


नाना पटोले म्हणाले, काँग्रेस पक्षाचे अभियान आहे. काँग्रेसमध्ये हुकूमशाही नाही, सगळे नेता मंचावर होते. सर्व धर्म समभाव आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल आदर आहे, कोणाला कोणत्या धर्मात आणता येत नाही. सुरजागड संदर्भात आमदराची बैठक घेऊ, प्रकल्प जावं अशी आमची इच्छा नाही. तिथं भिलाईसारखं मोठा प्रकल्प व्हावा. या प्रकल्पाची लूटमार सुरु आहे, असे विधान त्यांनी केले.


जे नेते आजच्या बैठकीत अनुपस्थित आहे, त्यापैकी बहुतांशी लोक पूर्वपरवानगीने अनुपस्थित होते. मात्र जे विनासूचना अनुपस्थित आहेत, त्यांना आम्ही विचारणा करून नोटीस देऊ. जे आले नाही त्यांना नोटीस देऊ, करवाई होईल, असे नाना पटोले म्हणाले.


आगामी निवडणुकांबाबत काय म्हणाले होते शरद पवार?


आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी म्हटले होते. 2024 मधील विधानसभा (Assembly Elections) आणि लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले. (Maharashtra Political News ) एकत्र निवडणुका लढण्याच्या रणनीतीवर सध्या चर्चा सुरु आहे, पण अजून अंतिम निर्णय झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना हे विधान केले होते. 


आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) आणि काँग्रेस (Congress) तसेच शिवसेना (Thackeray Group) या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नाही, असे त्यांनी यावेळी पवार म्हणाले होते. आता नाना पटोले यांनी काँग्रेसचा स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत नक्की काय चाललंय, याची चर्चा सुरु झालेय.