Shivsena MP Sanjay Raut on Shinde Faction: आपला पक्ष डॅमेज झालेला नाही. पक्षातून कोणी सोडून गेलेले नाही. कधीही निवडणुका घ्या. (Maharashtra Political News) एवढेच नाही तर कोणत्याही चिन्हावर निवडणूक घ्या. खात्रीने सांगतो की कोणताही आमदार, खासदार निवडून येणार नाही. आम्हीच निवडून आणले होते, असा दावा शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केला आहे. त्याचवेळी  'त्यांच्या'वर गद्दारीचा शिक्का बसलाय. तो कायम राहणार आहे. तो काही पुसला जाणार नाही. पिढ्यान पिढ्यांना गद्दारी जगू देणार नाही. सोडून गेलेल्या खासदारांनी कबर खणली आहे, असा घणाघात राऊत यांनी शिंदे गटावर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समाचार घेतला. राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर केली होती. त्याला राऊत यांनी उत्तर दिलेय. राणेंचे डोके ठिकाणावर नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. उडू द्या त्यांना. नारायण राणे यांना काही कळत नाही. मी आधी ही सामना संपादक होतो आणि आता ही आहे, असे राऊत म्हणाले.  ( हेही वाचा - खासदार उदयनराजे भोसले आक्रमक, रायगडावर आक्रोश आंदोलन )


 40 नेते गेले असले तरी, पक्ष जमिनीवर - राऊत


काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली असं होतं नाही. 40 नेते गेले असले तरी, पक्ष जमिनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.


'माझा बाप चोर आहे...'


अमिताभ बच्चन यांनीही दंडावर कोरलं होतं, माझा बाप चोर आहे. तसाच प्रकार 
(शिंदे गट) यांच्याबाबतीत आहे. त्यांच्याही पिढी हातावर कोरतील हे गद्दार आहेत. पिढ्यान पिढ्यांना गद्दारी जगू देणार नाही. सोडून गेलेल्या खासदारांनी कबर खणली आहे. या राज्यातील जनता खोक्याना त्यांची जागा दाखवून देतील, असे राऊत म्हणाले.


आमची सुरक्षा काढली, काही फरक नाही...


नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांचं करिअर आता संपलं आहे. कोणत्या ही गावात जा. सगळीकडे 'खोकेवाले आले' असंच बोलतात यांना. आमची सुरक्षा काढली...आम्ही एकटे फिरत आहोत. मर्दा सारखा फिरतोय. त्या गटात काय सुरु आहे ते मला माहित आहे. खटके उडता आहेत. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.


सीमावादावरुन शिंदेंवर घणाघात 


कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी. सीमावादावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात केला. कर्नाटकने जतमध्ये सोडलेल्या पाण्यात महाराष्ट्राच्या मुख्य़मंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. आता कुठे गेली तुमची क्रांती असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. 


राऊत यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद 


शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. कायम राजकीय फटकेबाजी करणा-या राऊतांनी आज क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. नाशिकमधील संभाजी स्टेडियम इथं क्रिकेट स्पर्धेला उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेला उपस्थिती लावल्यानंतर क्रिकेट खेळण्याचा मोह संजय राऊत यांना आवरला नाही.