viral video: भर कार्यक्रमात हास्याचे फवारे; मुख्यमंत्र्यांच्या मिश्लिकीनं जिंकली उपस्थितांची मनं
CM Eknath Shinde Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा - भाईंदरच्या विकासावर एका भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक लाईट गेल्यानं एकच गोंधळ उडाला त्यातून अशाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मिश्किल उत्तर ऐकून सगळकडे हास्याचा फावरा उडाला.
प्रथमेश तावडे, झी मीडिया, भाईंदर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच समृद्धी महामार्गाच्या (samruddhi mahamarg) उद्धाटनप्रसंगी हजेरी लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी समृद्धी महामार्गाचे उद्धाटन केले आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेत होते आता पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रसंगामुळे मुख्यमंत्री चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा कार्यक्रमादरम्यान अचानक लाईट्स गेले आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गंमतीमुळे सगळीकडे एकच हशा फुटला. मुख्यमंत्र्यांच्या मिश्किलीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. (maharashtra politics a power outage occurred during Eknath Shinde's speed in the Sanskruti Arts Festival 2022 in Mumbai)
भाईंदरच्या इंद्रलोक परिसरात शिवसेना (Shivsena MLA) आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने 'संस्कृती आर्ट फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी भाषणातून संवाद साधला. यावेळी मीरा भाईंदरच्या विकासावर ते बोलत असताना अचानक लाईट गेल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shine) यांनी मिश्किलपणे 'भाषण बंद करू का?', असं म्हणत प्रसंगावधान राखले आणि लाईट गेल्यानं किंचित वैतागलेली मंडळींही खुश झाली.
हेही वाचा - Washim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न
पाहा व्हिडीओ :
आपल्या भाषणात त्यांनी मीरा-भाईंदराच्या विकासावर टिप्पणी केली. ते म्हणाले, मीरा - भाईंदरमध्ये विकास होणे आवश्यक आहे. यावर अनेकांनी टाळ्या वाजवल्या तेवढ्यात अचानकच लाईट गेले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी (Eknath shinde funny video) गंमती उत्तरं दिलं, अरे क्या हुआं भाई, भाषण बंद करू क्या? साहेब, पोलिस कमिशनर ने बंद किया क्या? असं म्हणाले. त्यावर सगळीकडेच एक हशा उडाला. लाईट बंद झाले तरी मुख्यमंत्री यांनी भाषण सुरूच ठेवले पण यावेळी ही लाईट पोलीस कमिशनरने घालवली का असा सवाल उपस्थित केला.