Sindudurga :  मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळला. याविरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने मालवणमध्ये पुतळ्याच्या ठिकाणी महायुती सरकारविरोधात (Mahayuti Government) आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार नारायण राण समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने सामने आले. यावेळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी राणे आणि महायुती सरकारवर निशाणा साधला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोर्चामध्ये काही चिंधीचोर आले, श्रावण आहे नाहीतर खिशातून कोंबड्यापण काढल्या असता त्यांच्या, घाणीकडे लक्ष द्यायचं नाही असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. आज जो बालिशपणा आहे, जो भ्रष्टाचार आहे तो त्यांच्याचमुळे उघड झाला आहे. इथला स्थानिक खासदार चार दिवसांनी इथे आला. महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे, सत्ताधाऱ्यांनी जरी भ्रष्टाचार केला असला तरी आपण इथल्या मातीतील लोकं आहोत, आपण मावळे आहोत, म्हणून आम्ही इथे आलो आहोत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.


भाजपच्या राज्यात गेल्या दहा वर्षात जे जे काम भाजपने केलंय त्या कामाला गळती लागली आहे. असं एकही काम नाही ज्या कामात भ्रष्टाचार झाला नाही. राम मंदिर, नविन संसद भवन, दिल्लीचं विमानतळ, रेल्वेचं दररोज अपघात होतायत, मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था काय झालीय असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केलाय.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम या मिंदे सरकारने कोणाला दिलं हे समोर यायला हवं. कोण आहे हा आपटे? समुद्रकाठी उभारलेला हा पुतळा आठ महिन्यात पडला. गेट वे ऑफ इंडियाला देखील शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्याला काही झालं नाही. मग हा पुतळा कसा कोसळला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. भाजपाने रेवन्ना नावाच्या राक्षसाला जसं पळायला मदत केली. तसं या आपटेला पळू दिलं का, हे आपटे कोण आहे? कुठे गेले? हे आम्हाला पोलिसांनी सांगतिलं पाहिजे. 


हा आपटे कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे. त्याने पैसे किती खाले असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलं आहे. मिंदे सांगतात वारा आला, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मिमिक्री करुन दाखवली. आजपासून प्रत्येक दिवस हे सरकार गाडण्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं आहे. आम्ही दिल्ली समोर झूकणार नाही असं सांगत आदित्य ठाकरे यांनी लढायला तयार आहोत अंस आवाहन केलं. 


मालवणमध्ये राडा
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला... शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पुतळ्याची  पाहणी करण्यासाठी आले त्याचवेळी नारायण राणे किल्ल्यामध्ये होते.. यावेळी राणए समर्थकांनी आदित्य ठाकरेंना रोखल्यानं संघर्षाला सुरुवात झाली.. प्रवेशद्वारावरच दोन्ही जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली.. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली... वाद आणखी चिघळूनये म्हणून पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


कोकणात झालेल्या ठाकरे-राणे कार्यकर्त्यांच्या राड्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.  जे मालवणला रस्ता अडवून बसले ते शिवद्रोही होते. शिवद्रोही आडवे आले.  त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसलेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय.