Eknath Khadse : राज्याच्या राजकारणात मोठी धक्कादायक घडामोड घडणार आहे.  एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. खुद्द एकनाथ खडसेंनीच झी २४ तासशी बोलताना ही माहिती दिली. एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश  राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे भाजपात प्रवेश करणार आहेत.  त्यामुळं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला.. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं. आता जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितं लक्षात घेऊन खडसेंना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय. रावेरमध्ये खडसेंच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलीय. दरम्यान, खडसेंच्या प्रवेशाचा मुहूर्त अजून ठरलेला नसल्याचं समजतंय


एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत..त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही.. असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. तर जोपर्यंत घटना घडत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही असं रक्षा खडसे म्हणाल्या.