Maharashtra Politics : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात (Parli Constituency) भाजपाच्या (BJP) पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. निकालानंतर पंकजा मुंडेंनी यांनी आपला पराभव मान्य केला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांनी या पराभवाबद्दल भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण आता सांगितलं आहे. पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा आजपासून सुरु झाला आहे. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी याबाबत भाष्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बापाच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात मी राजकारणात आले. मुंडेसाहेब एकटे पडले, असं वाटल्यावर मी माय झाले. मी भ्रष्टाचार मुक्त कारभार केला. तरी माझ्यावर आरोप झाले. आज सकाळी कुणी कुठे, दुपारी कुणी कुठे. या सगळ्यामुळे डोकं फिरलं. म्हणून मी दोन महिने सुट्टी घेतली. मला सल्ले देणारे अनेक आहेत. 2019 ला तिसरा उमेदवार असता, तर परळीत माझा पराभव अशक्य होता", असा दावा पंकजा मुंडे यांनी केला आहे.


"आता संघर्षकन्या नाव बदलायचा ठरलं आहे. कारण सगळे गांभीर्याने घेत आहे. यापुढे आपल्या वाट्याला संघर्ष नाही आला पाहिजे. माझ्या उरात शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करेल. राजकारण काट्यावर चालणाऱ्या व्यक्तीला संघर्ष आहे. आमच्याकडे मिशनही नाही आणि कमिशनही नाही. माझ्याकडे बदल्या करायला आहे का काही? मी आता राजकीय भाषण केलेलं नाही. राजकीय भाषण विधानसभा निवडणुकीपूर्वी करु," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.


दरम्यान, धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा 28 हजार 116 मतांनी पराभव केला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी प्रचारसभा घेऊनही पंकजांचा पराभव झाल्यानं भाजपालाही मोठा धक्का बसला होता.