Raj Thackeray :  देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मध्य प्रदेशात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.  अमित शाहांनी मध्य प्रदेशात भाजपाला निवडून दिलं तर रामलल्लाचं दर्शन फुकट करून दिलं जाईल अशी घोषणा केली. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टिका केली. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोफत अयोध्यावारीवरुन टोला लगावला आहे. भाजपने टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवं खातं उघडण्याची सुरुवात केली असावी. काय कामं केलीत यावर निवडणूक लढवा. राम मंदिराच्या दर्शनाची आमिष कसली दाखवली जातायत. काय निर्णय लागतायत हे माहित नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच रविवारी विश्वचषककाचा अंतिम सामना आहे. दुसऱ्या सेमीफायनलमधून डो संघ फायनला जाईल त्याला 'साहबने बोला है हारने को' असंही सांगितलं जाऊ शकतं असा टोलाही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका आणि विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांसाठी मनसेने आतापर्यंत केलेल्या कामांचा राज ठाकरे यांनी आढावा घेतला. यासाठी ते ठाण्यात आले होते. यांच्या निवडून येणाच्या स्वार्थी राजकारणापायी महाराष्ट्र खड़्ड्यात घातला जातोय. ज्या महाराष्ट्राचं उदाहरण देशात दिलं जातं. सर्व बाबतीत महाराष्ट्र अग्रेसह होता, आहे आणि पुढेही राहिल. पण महाराष्ट्राच्या इमेजला धक्का लावण्याचं काम केलं जात अल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवला जात असून महाराष्ट्राचाही बिहार आणि उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणारन नाही असं राज ठाकरेंनी म्हटंलय. 


राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीय राजकारण वाढल्याच्या आरोपाचाही राज ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेला नाही. अनेक जणं गेलीत. 58 वर्ष काँग्रेसने देशावर राज्य केलं. त्या काँग्रेसचे गेल्या निवडणूकीत 55 खासदार निवडून आले, शेवटी परमेश्वराची काठी असतेच असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. 


माझ्या पक्षात कोणत्याही जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही,  असं जर कोण करत असेल तर त्या व्यक्तीला तात्काळ दूर करेन, माझ्यासाठी जातीपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, चांगल्या क्षमतेचा माणूस असेल तर मी जातपात मानत नाही असंही राज ठाकरे म्हणाले.  राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातींचा द्वेष वाढला असं म्हटलं आहे.