Anandrao Adsul News : भाजप नेत्यांवरची अडसुळांची ही नाराजी... भाजप नेत्यांनी दिलेल्या शब्द न पाळल्यानेच आता घरी बसण्याची वेळ आल्याची उद्विग्न भाषा अभिजीत अडसुळांनी बोलून दाखवलीय. लोकसभा निवडणुकीआधी अमित शाहांनी अडसुळांना शब्द दिला होता.. आनंदराव अडसुळांना राज्यपाल करण्याचा... मात्र अमित शाहांनी शब्द देऊनही तो पाळला नसल्याचा आरोप अडसुळांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अडसुळांच्या या नाराजीनाट्याची सुरुवात होते ती लोकसभेच्या निवडणुकीपासून... अमरावती लोकसभेची मूळ जागा ही शिवसेनेची होती. लोकसभेसाठी अडसुळांनी नवनीत राणांविरोधात रान उठवलं होतं... मोदी तुझसे बैर नही, राणा तेरी खैर नही असा नाराही अडसुळांनी दिला होता. तेव्हा अडसुळांची राणांविरोधातली दुश्मनी जगजाहीर होती.. मात्र शिवसेनेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा भाजपसाठी सोडली... भाजपाने इथून नवनीत राणा यांना तिकीट दिलं. लोकसभेसाठी राणांना मदत करणार असल्याचं सांगून अडसुळांनी हा वाद थांबवला होता.. मात्र अमरावतीतून नवनीत राणांचा पराभव झाला.. अडसुळांनी राणांना खरंच मदत केली की नाही याचं उत्तर अनुत्तरितच राहिलं...आता अमित शाहांनी राज्यपालपदाच्या नियुक्तीचा दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप अडसुळांनी केलाय.


हा वाद खरंतर खूप आधीपासूनच सुरु झाला होता.. मुंबै बँकेची जागा अभिजीत अडसुळांनी प्रवीण दरेकरांना दिली होती. फडणवीसांच्या शब्दाखातर तेव्हा माघार घेतल्याचा दावा अडसुळांनी केला. मात्र अद्यापही स्विकृत संचालक केलं नसल्याचा आरोप अडसुळांनी केलाय.. 


शिवसेनेत फूट पडली तेव्हा अडसूळ हे उद्धव ठाकरेंसोबतच होते.. मात्र नंतर ते ईडीच्या कचाट्यात सापडले.. त्यानंतर अडसुळांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि मग ईडीचा ससेमिरा थांबला... एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या भावना गवळींचं तसंच कृपाल तुमाणेंचंही पुनर्वसन झालं.. मात्र आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप अडसुळांनी केलाय.  अमरावती लोकसभेची जागा नवनीत राणांना दिली. मुंबै बँकेचं अध्यक्षपद प्रवीण दरेकरांनी दिलं.. मात्र अडसुळांच्या पदरी त्यांना दिलेलं आश्वासनही आलं नाही त्यामुळे अडसूळ पिता-पुत्र निर्वाणीवर आलेत.