Maharashtra Politics : बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट (Shinde Group) हीच शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) गेल्या आठवड्यात जाहीर केलाय. यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांसह निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांनी शेण खाल्लं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला आहे. तर ठाकरे गटावर पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर आणखी एक पाऊल उचललं आहे. उद्धव ठाकरे गटाने यांनी शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेचे नाव आणि चिन्ह असे दोन्ही नाव हटवले आहे. ट्विटर हँडल आणि वेबसाईट हे दोन्ही शिवसेनेच्या नावावर होते आणि ते ठाकरे गट हाताळत होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.


निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रविवारी अचानक शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेल्याचे पाहायला मिळाले. तसेच या हँडलवर क्लिक केल्यानंतर रॉक अँड रोल असे नाव दिसत होते. या ट्विटर हँडलला दोघांनी फॉलो केले आहे. तसेच शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे समोर आले होते. सुरुवातीला दोन्ही हॅक झाल्याची चर्चा होत होती. मात्र आता ठाकरे गटानेच हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.


शिवसेनेच्या ट्विटरवरील ब्ल्यू टिक गेलं


ट्विटरने शिवसेनेच्या ट्विटर हँडलला व्हेरिफाईड करुन ब्ल्यू टिक दिलं होतं. व्हेरिफाईड असलेल्या शिवसेनेच्या ट्विटरचे हॅंडलचे हँडल नेम बदलल्याने ट्विटरने  ब्ल्यू टिक काढून घेतलं आहे.