Uddhav Thackeray vs Devendra Fadanvis : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते.  आज अमरवातीत (Amaravati) झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जहरी टीका केली. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. ते नागपूरला कलंक आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. नागपुरातील जाहीर सभेत फडणवीस आणि भाजपवर त्यांनी जोरदार निशाणा साधला. भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, असंच भाजपचं झालंय, असं ते म्हणाले. चाय पे चर्चाच्या धर्तीवर 'होऊन जाऊ दे चर्चा' अशी नवी मोहीम सुरू करण्याचं आवाहन ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर त्याची जमीन, घर किंवा पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं असं आजपर्यंत ऐकलं होतं. पण इकडे गावठी कट्ट्यावर पैसे दिले जात असल्याचं ऐकाला मिळालं. अशी अवलाद गृहमंत्र्यांच्या गावात आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तसंच गुन्हेगारी वाढलीय. हे गावठी कट्टा प्रकरण त्यातलंच एक उदाहरण असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. 


देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं असून उद्धव ठाकरे यांना कलंकीचा काविळ असं म्हटलंय. फडणवीस यानी आपल्या ट्विटमधअये म्हटलंय.
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!



नितीन गडकरींची टीका
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही टीका केली आहे. त्यांनी एक ट्विट केलं असन आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, श्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये श्री देवेंद्रजींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजकारणात भाषेचा स्तर राखायला हवा. आम्ही सरकारमध्ये असताना केलेले विकासकार्य आणि त्यांनी केलेले कार्य यावर त्यांनी जरूर चर्चा करावी, परंतु अशा पद्धतीने अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन व्यक्तिगत आरोप करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही, असं गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.



भाजप युवा मोर्चा आक्रमक
उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यांनी नागपूर विमानतळावर लागलेले उद्धव ठाकरे यांचा पोस्टर फाडून टाकले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा पद्धतीने टीका केली तर आम्ही सहन करणार नाही असाही इशारा भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.