Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती (retirement) घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीच्या (Election) राजकारणातून निवृत्त होण्याबाबत नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. समाजकारणात (Social cause) जास्त रस असून खूपदा निवडून आलो आहे, पटलं तर मत द्या असे नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी (rajya sabha) सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार की राज्यसभेवर जाणार अशी चर्चा रंगू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पद्मविभूषण वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते मोहन धारीया राष्ट्र निर्माण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्याला समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले आहे. तसेच जर तुम्हाला आवश्यक वाटले तरच मत द्या नाहीतर देऊ नका असेही नितीन गडकरी म्हणाले.


काय म्हणाले नितीन गडकरी?


"मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे," असे नितीन गडकरी यांनी जाहीरपणे कार्यक्रमात सांगितले आहे. 


"वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगारनिर्मितीही होऊ शकते. आपल्या लोकांना हित कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्व समजत नाही. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा आहे," असेही गडकरी यांनी म्हटलं आहे.


मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो


"जलसंवर्धन, वातावरणातील बदल आणि पडीक जमिनीचा योग्य वापर अशा क्षेत्रात प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि त्या क्षेत्रात आम्ही जिद्दीने काम करत आहोत. मी प्रेमाने नाहीतर ठोकून काम करतो. भविष्यात याच क्षेत्रात जोमाने काम करायचे आहे. कारण यामुळे भारताची अर्थव्यवस्था नाही तर ग्रामीण भागाचा चेहरामोहराही बदलू शकतो," असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.