पुणे शहरात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन, पोलिसांकडून कसून चौकशी
सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा पुण्यात वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती.
मुंबई : राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा पुण्यात वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानेही कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, काल उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर कडक लॉकडाऊनचे संकेत दिलेत. आज आणि उद्या असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरात संपूर्ण शनिवार आणि रविवार लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी कडक बंदोबस्त केला आहे.
कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. या आठवड्यात चांगले रिझल्ट आले आहेत . फक्त ग्रामीण भागात पेशंट वाढले हायकोर्टाने सरकारला सांगितले. कडक लॉकडाऊनबाबत मत व्यक्त केले आहे. मला त्याबाबत जास्त काही बोलायचं नाही, असे ते म्हणाले.
तिसऱ्या टप्यात सामोरे जावे लागेल असं अनेक जण सांगत आहेत. दुसऱ्या टप्प्यात अनेक धावपळ करावी लागली आहे. आता पुढच्या वेळेस धावपळ होऊ नये याकरिता पायाभूत सुविधा उभं करत आहोत. ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्याची तयारी सुरु आहे. 18 ते 44 च्या वयोगटातील लोकांना सरकार देणार होते. मात्र,- पुरवठा नसल्यानं लसीकरण करण्यास अडचण येत आहे. अदर पुनवाला यांना फोन लावला होता, ते अजून तरी दहा बारा दिवस इथं येणार नाही. तिथे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
पहिला डोस दिला त्यांना दुसरा डोस द्यायला पाहिजे. 40 दिवस उलटून गेले, मात्र लस न दिल्याने संभ्रम निर्माण झालाय. मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांशी बोलणार आहे. दुसरा डोस बाबत त्याला प्राध्यान द्यायचा विचार आहे . परदेशातील लस खरेदी करायला केंद्राने परवानगी द्यावी. दरांमध्ये तफावत नको. कोर्टाने त्याबाबत सांगितलं आहे. तशी बैठक घेण्याचा विचार करतोय असे अजित पवार म्हणाले.