Maharashtra Rain : ऑक्टोबर महिन्याची सुरूवात ही परतीच्या पावसाने होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 48 तास मुसळधार पाऊस बरसणार आहे. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण गोवा येथे पुढच्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवमान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असल्यामुळे याचा परिणाम पुण्यावर देखील होणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता तेथे वर्तवण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जोर धरला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने जोर धरला आहे. 


मुंबईतला पाऊस 


भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुपार आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो, असे हवामान तज्ज्ञांनी सूचित केले आहे. मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची बरसात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटामुळं सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट असं चित्रही शहरातील काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि ते आजही दिसेल. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी शहरात आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  



परतीचा पाऊस 


भारतात नैऋत्य मान्सून वारे म्हणजेच मान्सूनच्या पावसाचा कालावधी जून ते सप्टेंबर असा असतो. राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. ४ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून दिनांक ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


रेड अलर्ट 


कोकण किनारपट्टीला मात्र हवमान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहीर केल आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशार देण्यात आलाय. महाराष्ट्राच्या उत्तर, मध्य, पश्चिम मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर भागाल यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे.