Maharashtra Rain : अवकाळी पावसाने झोडपले, पिक भुईसपाट तर बळीराजा पुरता आर्थिक संकटात
Maharashtra Rain : अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे.नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Maharashtra Rain : पुण्यात मंचर अवसरी परिसरात रात्री जोरदार गारपीट झाली. बळीराजाच्या शेतमालाचे मोठं नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नंदुरबारमधील हजारो हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाले आहे. कांदा, गहू, हरभऱ्यासह मिरची, पपई, केळी बागांचं मोठे नुकसान आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात गारपिटीनं पिक भुईसपाट झाले आहे. शेत, रस्ते, अंगणात टपोऱ्या गारांचा खच. पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर येवल्यात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. अंदरसुल परिसरात कांदा,आणि गहू जमीनदोस्त झालंय..काढून ठेवलेला 3 एकरांवरचा कांदा भिजलाय..ढगाळ वातावरण आणि पाऊस यांमुळे मक्याचं देखील प्रचंड नुकसान झाले आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातल्या मंचर अवसरी परिसरात रात्री गारपीट झाली. गारांचा खच पडल्याचं दृश्यांमध्ये दिसून येतंय. गारपिटीमुळे बळीराजाच्या शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, द्राक्ष, डाळिंबाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त
अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. कांदा, गहू, हरभरा या रब्बी पिकांसह मिरची, पपई, केळी फळाबागांचे ही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, आसमानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. जिल्ह्यात सर्वच भागात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आणि गारपिटीमुळे गहू जमीनदोस्त झाला आहे तर हरभऱ्याच्या प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका
अवकाळी पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बसला आहे, त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनाही बसल्याचे चित्र आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी केलेली हजारो क्विंटल मिरची वाळवण्यासाठी मिरची पठारींवर टाकण्यात आली होती. तीही अवकाळी पावसात भिजल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र आहे मायबाप सरकारने कागदी घोडे नाचवून पंचनामे करण्याचा फास पुढे न करता अधिवेशनातच शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी हीच अपेक्षा.
पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर आणि मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसानं झोडपलं. काढणीला आलेल्या गहू, हरभरा,ज्वारी पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेचं मोठं नुकसान झालंय. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला.
धुळे जिल्ह्यातल्या टिटाने गावातले शेतकरी प्रकाश पाटील यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी गहू, कांदा, बाजरी आणि हरभऱ्याची लागवड केली होती. हातातोंडांशी हंगाम आलेला. पीकही उमदं असल्याने दोन पैसे हाती येतील अशी आस त्यांना होती. मात्र गेल्या 24 तासांमध्ये गारपिटीनं होत्याचं नव्हतं केलं. गहू भुईसपाट झाला.. हरभरा मातीमोल झाला... अवघ्या काही तासांच्या गारपिटीनं प्रकाश पाटील पार कोलमडून गेलेत... कारण आता त्यांच्या हाती काहीच लागणार नाहीए. कर्ज कसं फेडावं? घर कसं चालवावं? मुलांचे शिक्षण कसं करायचं? असे अनेक प्रश्न प्रकाश पाटील यांच्या मनात काहूर माजवतायत.
निफाड तालुक्यातील उगावमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पानगव्हाणे यांची 2 एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने मोठ्या कष्टाने जगवलेल्या बागेचं आतोनात नुकसान केले आहे.