मुंबई - हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी बालेवाडीच्या मैदानावर महाराष्ट्रातील संघांचे सराव शिबिराचे क्रीडा विभागाने आयोजन केले आहे. या शिबिराला शनिवारी पासून सुरुवात झाली आहे. हे शिबिर ३१ मेपर्यंत चालणार आहे. या वर्षीच्या स्पर्धेत तब्बल ३५६ खेळाडू राज्यातून सहभागी झाले आहेत. २१ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. हरियाणातील पंचकुला या मुख्य मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. ४ जूनला या स्पर्धेचे उद्धघाटन होईल तर येत्या १३ जूनला स्पर्धेची सांगता होणार आहे. बालेवाडीतील सराव शिबरानंतर १ जूनपासून खेळाडू हरियाणाला जाण्यासाठी निघतील. ८ जूनपर्यंत सर्व खेळाडू आणि संघ हरियाणात दाखल होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेलो इंडिया स्पर्धा 
केंद्र सरकार २०१८ पासून खेलो इंडिया ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घेते. त्यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये प्रोत्साहान मिळते. गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी सर्वाधिक पदकांची लयलूट केली आहे. आतापर्यंत खेलो इंडिया महाराष्ट्र अव्वल राहिला आहे. याही वर्षी तो कायम राहण्याचा निर्धार खेळाडूंनी केला आहे.


सहभागी क्रीडा प्रकार
राज्यातील तब्बल २१ क्रीडाप्रकारातील संघ खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कंसात सहभागी खेळाडूंची संख्या कब्बडी (२४),  बॅडमिंटन (४), कुस्ती  (३३), गटका (१६), थांग ता (५), योगासन (२२), वेटलिफ्टिंग (२०), जिम्नॅस्टिक (४५), सायकल ट्रॅक ( ६), शुटिंग (७), टेनिस (६), मल्लखांब (१२), जलतरण (२८), खो-खो (२४), बास्केटबॉल (१२), ॲथलेटिक्स (३६), टेबल टेनिस (८), बॉक्सिंग (१६), ज्युदो (१४), सायकल रोड रेस (६), आर्चरी (१२). असे २१ संघ स्पर्धेत उतरणार आहेत.


खेलो इंडियात महाराष्ट्राची कामगिरी
सन २०१८ मध्ये - सुवर्ण ३६, रोप्य ३२, कांस्य ४३ असे तब्बल १११ पदक मिळवले होते. 
सन २०१९ मध्ये - ८५ सुवर्ण, ६१ रौप्य आणि कांस्य ८१ असे २२७ पदक पटाकवले होते. 
सन २०२०मध्ये  - ७८ सुवर्ण, ७७ रौप्य व १०१ कांस्य अशी एकूण २५६ पदक पटकावली होती.