मुंबई : महाराष्ट्रात आज पुन्हा एकदा कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळतो आहे. आज राज्यात कोरोनाचे ३६ हजार ९०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधीकाळी ३६ हजार ही संख्या अख्ख्या देशभरातील नव्या कोरोनाग्रस्तांची असायची. मात्र आता ती एकट्या महाराष्ट्रात नोंदवली जाऊ लागली आहे. कोरोनाची हीच परिस्थिती लक्षात घेता, राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. तसेच सणांच्या पार्श्वभूमीवरही अनेक ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 


राज्यातल्या कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती रुग्ण? 


जिल्हा नवे कोरोनाग्रस्त आज मृत्यू
मुंबई ५ हजार ५१३ ०९
नागपूर ४ हजार ९५ ३५
पुणे ३ हजार ५९४ ३१
पिंपरी-चिंचवड १ हजार ८२५ १३
नांदेड ९७० १४
ठाणे (मनपा) ९९० ०२
कल्याण-डोंबिवली (मनपा) ८२५ ०३
लातूर ५३८ ०१
रायगड ४९१
यवतमाळ ४५८
बीड ३८३
सांगली १४७ ०१