मुंबई : आज राज्यात ४९३० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे.  तसेच आज ६२९० नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६९१४१२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.४९% एवढा झाला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०९१५६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८२८८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५३८०८४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १५०७८ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५७७६ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा २०२१५ इतका आहे. 


 देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.