मुंबई : आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर राज्यात २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२८,०२,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३५,७८,१६०  नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३४,५५,२०६ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्येआहेत तर २८,४९४ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत 9935 कोरोना रुग्णांची नोंद तर 54 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर  राज्यात 58,952 रूग्णांची नोंंद , 278 जणांचा मृत्यू झाला आहे. 



धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात रेमडिसीवर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजना करावी यासाठी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉ. व्ही. जी. सोमानी यांची दिल्लीत भेट घेतली.



करोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100% लसीकरण करण्याची रणनिती महाराष्ट्रासाठी महत्वाची आणि कळीची असल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे उद्दिष्ट ठेवून राज्यातल्या सर्व वयोगटातील 100% लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवंय असं त्यांनी म्हटलंय.