मुंबई : आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचणी येत आहे. एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे वेबसाइट क्रॅश झाली आहे. मात्र विद्यार्थी या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती मिळाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलेला आहे. (Maharashtra SSC Result Link, Where and how to check class 10th students result )  50 गुण नववीच्या परीक्षेच्या आधारावर, 30 गुण सराव परीक्षा  आणि 20 गुण अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आहेत. (SSC Result 2021 : दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी) 


 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.


या चार स्टेप्सने मिळवा तुमचा सीट नंबर 


http://result.mh-ssc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जावा
यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करा
यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल


सीट नंबर मिळाल्यानंतर असा पाहा निकाल


SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा
तुमचा सीट नंबर टाइप करा
आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका
तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल.
भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा
कुठे पाहाल निकाल?
http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.
याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.