SSC Result 2023 : कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार जास्तीचे टक्के? पाहा निकालांबाबतची मोठी Update
Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला आहे.
Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) कडून इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा निकाल 98.83 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी नागपूर विभागाचा निकाल लागला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि विभागावार टक्केवारीची माहिती दिली.
राज्यातून एकूण 1577 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती आणि ही परीक्षा केवळ 533 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. माध्यमिक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 84 हजार 416 मुले आणि 73 हजार 62 मुली आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर इयत्ता 10वी मार्च-एप्रिल 2023 च्या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत.
वाचा: दहावीचा निकाल जाहीर; नेहमीप्रमाणे मुलींनीच मारली बाजी
25 विषयांचा निकाल 100 टक्के
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घटला असून 25 विषयांचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
राज्याचा निकाल: 93.83 टक्के
पुणे: 95.64 टक्के
नागपूर: 92.05 टक्के
औरंगाबाद: 93.23 टक्के
मुंबई: 93.66 टक्के
कोल्हापूर: 96.73 टक्के
अमरावती: 93.22 टक्के
नाशिक: 92.22 टक्के
लातूर: 92.67 टक्के
कोकण: 98.11 टक्के
नागपूर विभाग: 92.05 टक्के
मुलींचा निकाल: 95.87 टक्के
मुलांचा निकाल: 92.05 टक्के