मुंबई : भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचं भाजपने पुनर्वसन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस हे पद देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे. तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 


भाजपची कार्यकारिणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरचिटणीस - चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, सुजितसिंह ठाकुर, रवींद्र चव्हाण


उपाध्यक्ष - राम शिंदे, संजय कुटे, माधव भंडारी, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, जयकुमार रावल, कपिल पाटील, भारती पवार


प्रदेश कार्यकारिणी सदस्य (विशेष निमंत्रित)- विनोद तावडे, एकनाथ खडसे, नारायण राणे, गणेश नाईक, प्रकाश मेहता


प्रदेश कार्यसमिती सदस्य- मेधा कुलकर्णी


विधानसभा मुख्य प्रतोद- आशिष शेलार


विधानसभा प्रतोद- माधुरी मिसाळ


किसान मोर्चा अध्यक्ष- अनिल बोंडे


कोषाध्यक्ष पदावर शायना एन सी यांच्याऐवजी मिहीर कोटेजा यांची नियुक्ती


केशव उपाध्ये- मुख्य प्रवक्ते