मोठी बातमी : हीच ती वेळ हाच तो क्षण, अखेर उद्या बारावीचा निकाल
दुपारी एक वाजता जाहीर होणार निकाल
मुंबई : अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जुलै २०२०, गुरुवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षण मंडळ अर्थात बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान निकालांच्या निमित्ततानं दरवर्षी होणारी बोर्डाची कोणतीही पत्रकार परिषद यंदा मात्र होणार नाही.
कुठे पाहता येणार निकाल?
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खालील संकेतस्ळांना भेट द्यावी.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्याच धर्तीवर बारावीच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली. आता दहावीच्या निकालांकडे विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष असेल.