योगेश खरे/ नाशिक : संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट 'अ' च्या वर्ग एकची चक्क २४७ पैकी १६५ पदे भरलेली नाहीत. ही सर्व पदं स्पेशालिस्ट डॉक्टरांची आहेत. नाशिक जिल्ह्यात विशेष डॉक्टरांची वानवा असल्याने मृत्यू वाढल्याचं स्पष्ट होत आहे. वर्ग दोनच्या अ श्रेणीतही अशी स्थिती आहे. विभागात एकूण १९० पदं भरलेली नाहीत. तर दोन बची ३९ पदं रिक्त आहेत. 


६ महिन्यात १८७ बालमृत्यूंनी केवळ नाशिकचं नाही तर संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणा हादरून गेलीय. मात्र सरकारी पातळीवर यावर तातडीने कारवाई होण्याऐवजी केले जातायत फक्त आऱोप प्रत्यारोप. नाशिक शहरात जिल्हा शासकीय रूग्णालयं तु़डुंब भरली आहेत. पण मनपा रूग्णालयं ओस पडली आहेत. याचं नेमकं कारण काय? मनपाची आरोग्य यंत्रणा आपली जबाबदारी झटकतेय का असा प्रश्न साहजिक आहे. याचा झी २४ तासने तिथे जाऊन पंचनामा केला. त्यातून उघड झाला मनपाचा भोंगळ कारभार.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासकीय रूग्णालयात ज्या झाडांमुळे नवजात शिशू वॉर्डची जागा वाढवण्यास मिळत नाही. त्यावरूनही यंत्रणांमध्ये जबाबदारी ढकलली जातेय. तर तिसरीकडे नाशिक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची शेकडो पदं रिक्त असल्याचंही उघड झालंय. केवळ नाशिकमधलीच नाही तर राज्यातली आरोग्य यंत्रणा कशी व्हेंटीलेटरवर आहे याचंच हे प्रत्यंतर आहे.