पुणे : पोलिसांत भरती होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. येत्या काळात राज्यात ८ हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे. शिवाय पोलिसांच्या सोबत ७ हजार सुरक्षा रक्षकांचीही भरती केली जाणार आहे. राज्यात पोलिसांच्या जागा रिक्त आहेत त्या भरण्यासाठी सरकार अग्रक्रम देणार असल्याचे देशमुखांनी सांगितले आहे. दरम्यान, NPR आणि NRC ची अंमलबजावणी करायची की नाही बाबत राज्य सरकारच्या बैठकीत तीन्ही पक्ष चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ असंही देशमुखांनी सांगितले आहे.



 'तर कोरेगाव भीमा  प्रकरणी एसआयटी स्थापन करु'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार गुन्ह्यात आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २० तारखेला आंध्र प्रदेश मध्ये जाणार आहोत. येत्या काही दिवसात पोलीस खात्यात ८ हजार जागा भरणार, ७  हजार सिक्युरिटी गार्ड च्या जागा भरणार आहोत. आमचे म्हणणे एवढेच होते की एआयएकडे तपास देताना राज्य सरकारला विचारात घ्यायला हवे होते.  एआयए तपास करत असताना एसआयटी स्थापन करता येते का समांतर तपास करता येतो का याचा कायदेशीर सल्ला घेत आहोत, कायदेशीर तरतूद असेल तर कोरेगाव भीमा  प्रकरणी एसआयटी स्थापन करु, असे अनिल देशमुख म्हणालेत.


फोन टॅपिंग प्रकरणी आम्ही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, त्याचा अहवाल आला की या बाबत माहिती दिली जाईल. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व जाऊ देणार नाही. एनपीआर आणि एनआरसीबाबत राज्य सरकारच्या बैठकीत तीन्ही पक्ष चर्चा करू आणि त्यानंतर त्याच्या अमलबाजवणी बाबत निर्णय होईल. दरम्यान, शरद पवार यांनी पोलिसांना ताटकळत उभे राहावे लागते याबाबत दिलेल्या पत्रानंतर आम्ही समिती स्थापन केली आहे. त्यावर उपाय योजना केल्या जातील, असे ते म्हणालेत.