पुणे : टीईटी घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. बोगस सर्टीफिकेट घेऊन सेवेत रुजु झालेल्या शिक्षकांचा शोध सुरु आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण राज्य टीईटी परिषदेकेडं एकूण 6 हजार प्रमाणपत्र जमा करण्यात आले आहेत. तसेच जे टीईटीचं प्रमाणपत्र परिषदेकडे पडताळणीसाठी जमा करणार नाहीत, त्यांचा पगार थांबवण्यात येणार आहे.  त्यामुळे जे शिक्षक बोगस प्रमाणपत्र देऊन सेवेत रुजु झाले आहेत, त्यांची पाचावर धारण झाली आहे. तसेच प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीमुळे अखेर आता बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे.  (maharashtra tet exam scam state council of examination will cross checked of bogus certificate )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत टीईटीचे प्रमाणपत्र जमा केले आहेत, त्याची परिषदेकडून उलटतपासणी करणार आहे. या उलटतपासणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबतची माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.        



या कालावधीतल्या शिक्षकांना द्यावं लागणार प्रमाणपत्र


शिक्षक म्हणून 13 फेब्रुवारी 2013 नंतर ज्यांची प्राथमिक आणि आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची तपासणई केली जात आहे. जे शिक्षक कारवाईच्या भितीपोटी प्रमाणपत्र जमा करणार नाहीत, त्यांचा पगार थांबवला जाणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत अखेर प्रमाणपत्र परिषदेकडे सादर करावं लागणार आहे.