मुंबई : आजपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचं पुनरागमन झालंय. मुंबईत काल रात्रीचं किमान तापमान १५ अंशांपर्यंत खाली आलं. दोन दिवसांपूर्वी कमाल तापमान ३५ अशांपर्यंत चढलं होतं. 


धुक्याची चादर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर सांगलीतील मिरज शहर परिसरात थंडीमुळे धुक्याची चादर पसरलीय. धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम येत्या काही दिवसात राज्यातही दिसणार आहे.


मुंबईतील तापमान


मुंबईत मंगळवारी सांताक्रुझ येथे किमान तापमान १९ अंश से. होते. मागील दोन दिवसांपेक्षा तापमानामध्ये वाढ झाली असली तरी पुढील दिवसांमध्ये किमान तापमानमध्ये २ ते ३ अंश से. घट होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. 


विदर्भात काय स्थिती?


विदर्भात मागील दोन दिवसांमध्ये किमान तापमानात सरासरी २ ते ३ अंश से.ची घसरण झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ामध्ये किमान तापमानामध्ये घट झाली असून मंगळवारी उस्मानाबाद येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची ९ अंश से.ची नोंद झाली आहे.