Eknath Shinde | जाहीर कार्यक्रमात नगरविकास मंत्र्यांनी सौभाग्यवतीसाठी गायलं गाणं
राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांचा आज (9 फेब्रुवारी) वाढदिवस.
ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांचा आज (9 फेब्रुवारी) वाढदिवस. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांचा रोमॅन्टिक अंदाज पाहायला मिळाला. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या पत्नीसाठी गाणं गायलं. एकनाथ शिंदेचा गाणं गातानाचा व्हीडिओ व्हायरल होतोय. (maharashtra urban development minister eknath shinde sing a song for wife on his birthday)
'जब कोई बात बिघड जाये', या गाण्याचे काही शब्द एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसाठी गायले. तसेच सूत्रसंचालकाने त्यांना साथ दिली. एकनाथ शिंदे यांच्या पत्नींनी त्यांना गुलाबाचं फुल देताच त्यांच्या मनातले शब्द ओठांवर आले आणि त्यांनी आपल्या पत्नीसाठी थोडे का होईना पण गाणं गायलं. यावेळी त्यांनी डायलॉगबाजीही केली.
"मी कलाकार आहे पण मारामारी करत नाही असं म्हणत शिंदेंनी डायलॉगबाजी केली. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळाला.