Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्या
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.
Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तारख्या अजून जाहीर झालेल्या नाहीत. पण राज्यातील पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकांचं वारे सध्या वाहू लागलंय. विधानसभा निवडणुकीत विजयासाठी सर्व पक्षांनी आपली कंबर असली आहे. अशात गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politicle Updates) अनेक भूकंप पाहिला मिळतायेत. आज आपण विदर्भातील 12 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. (Maharashtra Assembly Election)
लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) विदर्भात भाजपचा धोबीपछाड करत काँग्रेसने घरवापसी केलीय. दहा मतदारसंघापैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिकंले तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत विदर्भात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभेमध्ये भाजप आणि महायुतीला खूप जोर लावावा लागणार आहे. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोन्ही नागपुरातील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे नवा वाद रंगला असल्याने या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलंय. (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Nagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2019 Result Winner Loser Party Candidates Details in Marathi)
अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का?
अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या काटोलमध्ये सलग चार वेळा जिंकून त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी एक असलेलं काटोल संत्रा व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. या तालुक्यात कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांचं उत्पादन घेतलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 2019 ते 2021 महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना गृहमंत्रीपदाची जबाबदारी पार केली आहे. मात्र मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपानंतर त्यांनी 2021 मध्ये त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी त्यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.
अनिल देशमुख यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास!
अनिल देशमुख काटोल मतदारसंघातून पहिल्यांदा 1955 मध्ये विजयी झाले. त्यावेळी भाजप शिवसेना सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
अनिल देशमुखांना मिळालेली मंत्रिपदं
1995 (युती सरकार) - कॅबिनेट मंत्री, सांस्कृतिक कार्य, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण
1999 (आघाडी सरकार) - राज्यमंत्री, माहिती व जनसंपर्क, शालेय शिक्षण
2001 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, अन्न व औषधीद्रव्य प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क
2004 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम
2009 (आघाडी सरकार) - कॅबिनेट मंत्री, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
2019 (मविआ सरकार) - कॅबिनेट मंत्री, गृहमंत्री
शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख
शरद पवारांचे विश्वासू नेते म्हणून देखील अनिल देशमुखांची ओळख आहे. 2019 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सराकरमध्ये जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांना डावलून शरद पवार यांनी गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांना बहाल केलं होतं.
अनिल देशमुख यांनी 2014 पर्यंत काटोल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांच्याकडे होतं. पण इथे पण काका पुतण्याची लढत 2014 मध्ये पाहिला मिळाली. अनिल देशमुख हे त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक जिंकत आपला बालेकिल्ला परत मिळवला. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख यांच्यासमोर भाजप कोणाला उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.