अमित ठाकरेंना `बिनशर्त पाठिंबा` मिळावा राज शिंदेंच्या निवासस्थानी? सूत्रांची माहिती
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: विशेष म्हणजे राज ठाकरेंची ही भेट पूर्वनियोजित नव्हती. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीआधी अचानक ते `वर्षा` बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले.
Raj Thackeray Meet CM Eknath Shinde: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'वर्षा' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या राजकीय भेटीमागील समिकरणं सध्या जोरदार चर्चेत असून ही भेट जवळपास 30 मिनिटं सुरु होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये काय झालं यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. सदर बैठकीला अमित ठाकरेंच्या संभाव्य उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
दोन्ही पक्षांमधील समन्वयासाठी बैठक?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी 30 मिनिटं बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली. बैठकीत विधानसभा निवडणुक विशेषत: मुंबईतील काही मतदारसंघासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही भेट मोठी राजकीय भेट असल्याचं सांगितलं जात असून या बैठकीमधून नवीन राजकीय समिकरणं समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंनी यापूर्वीच मनसैनिकांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील अनेक जागांवर मनसेनं दावा केला आहे. खास करुन वरळीचा जागा अशीच आहे जिथे मनसेने दावा केला असून या जागेवर शिंदेच्या शिवसेनेचीही नजर आहे.
श्रीकांत शिंदेंचा वरळी दौरा
रविवारीच जनसंवाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनी वरळीचा दौरा केला आहे. मनसे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष असा दोघांकडूनही जागेवर दावा केला जात असल्याचं अनेक जागांवर घडत आहे. अशाच राजकीय पेचप्रसंगांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली गेली. येणाऱ्या विधानसभेमध्ये मनसे-शिंदेंची सेना आमने-सामने येऊ नये यासाठी नियोजन केलं जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राज यांनी घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट ही पूर्वनियोजित नव्हती राज यांनी अचानक ही भेट घेतल्याने या भेटीमध्ये काय घडलं यासंदर्भातील उत्सुकता कायम आहे.
नक्की वाचा >> 'शिंदे सरकारने राज्यावरील कर्ज ₹8000000000000 वर नेलं; ‘लाडकी खुर्ची’...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
अमित ठाकरेंच्या उमेदवारीच्या चर्चेसाठी बैठक बोलावली?
दरम्यान, राज ठाकरेंनी आज त्यांच्या निवासस्थान शिवतीर्थावर पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज ठाकरेंनी या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेतील तपशील राज पदाधिकाऱ्यांबरोबच्या चर्चेत मांडणार का? याबद्दलची उत्सुक कायम आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे मनसे नेते आणि नेमलेले निरीक्षकांकडून मतदारसंघनिहाय आढावा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या पुढच्या दौऱ्याविषयी या बैठकीत चर्चा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाचा दौरा केला होता. विधानसभा निवडणूक लढवण्याची अमित ठाकरे यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. अमित ठाकरेंच्या उमेदवारीसंदर्भात मनसेच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरेंनी या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीत काय चर्चा झाली आहे याबद्दलची चर्चा मनसे पदाधिकाऱ्यांमध्येही आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजपा-शिंदेंचा मास्टर प्लॅन? जाणीवपूर्वकरित्या...
पाच संभाव्य विषय ज्याच्याबद्दल राज आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाली चर्चा
1) एकीकडे विधानसभा निहाय मनसेच्या निरीक्षकांची बैठक सुरू असताना या बैठकीमध्ये किती जागांवर मनसे पारडं जड आहे या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकते? याची चाचपणी केली जात आहे.
2) राज ठाकरे महायुती सभा लोकसभा निवडणुकीमध्ये होते त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते? याबाबत चर्चा झालेली शकते असंही सूत्रांचं म्हणणं आहे.
3) दादर माहीम हा शिवसेनेचा पारंपारिक गड जिथे आता सदा सर्वणकर शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे सदा सर्वणकरांना सिद्धिविनायक न्यासी अध्यक्षपद दिले असताना ही जागा मनसेसाठी सोडण्याची शक्यता आहे का? याचीही चाचपणी केली गेल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
4) अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का? याबद्दलची संभाव्य चर्चा मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये झाली असू शकते.
5) राज ठाकरे यांच्यावरील येक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये राज ठाकरे देऊ शकतात, असंही म्हटलं जात आहे.