सीमा आढे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Vidhansabha Election 2024) विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सगळ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे. राज्यात मविआची सरकार येणार की महायुतीची सत्ता येणार याबाबत वेगवेगळे अंजाद लावले जात आहेत. शनिवारी याचाच निकाल लागणार त्यापूर्वी (Sharad Pawar) शरद पवार गटाच्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत मतमोजणी विषयी उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. सोबतच (MVA) महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार याबाबतची उमेदवारांना सांगितल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी17 फॉर्म वरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी 9 वाजता ही बैठक पार ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. निकालाचे प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असं या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सांगण्यात आलं. या आदेशांच्या धर्तीवर आता पुढील राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : अजित पवारांच्या विजयाआधीच लागले मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर्स


 


मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध संस्थांचे वेगवेगळे एक्झिट पोलचे आकडे समोर आले. त्यात एखादा अपवाद वगळता सगळ्यांनी महायुतीची सरकार राज्यात स्थापन होणार असा अंदाज व्यक्त केला. मात्र आज सकाळी झालेल्या याबैठकीत महाविकास आघाडी 157 पर्यंत जाऊ शकते असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय. 


निकाल जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीने निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधला जात आहे. तसेच राज्यातील छोट्या मोठ्या पक्षांशी देखील संपर्क साधला जात आहे. मात्र निकालानंतर ते कोणत्या आघाडीला साथ देणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.