Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवारांनी उमेदवारांची निवड करताना जुन्या जाणत्या आमदारांवरच पुन्हा विश्वास टाकलाय. अजित पवारांची पहिली यादी जवळपास निश्चित झाली असून या यादीत त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचीच वर्णी लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरलेल्या अजित पवारांसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे. अजित पवारांचे अनेक नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची साथ सोडून चाललेत. पक्षाला गळती लागलेली असतानाच अजित पवार विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार का याबाबत उत्सुकता होती. पण झी 24 तासला राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांवरच भरवसा ठेवलाय. अजित पवार दोन जागांचा अपवाद वगळता विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्याच्या विचारात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) अजित पवार- बारामती २) छगन भुजबळ- येवला ३) दिलीप वळसे पाटील- आंबेगाव ४) हसन मुश्रीफ- कागल ५) धनंजय मुंडे- परळी ६) धर्मराव बाबा आत्राम- अहेरी ७) माणिकराव कोकाटे- सिन्नर ८) नरहरी झिरवाळ- दिंडोरी ९) आदिती तटकरे- श्रीवर्धन १०) दत्तात्रय भरणे- इंदापूर ११) दौलत दरोडा- शहापूर १२) शेखर निकम- चिपळूण
१३) सरोज अहिरे- देवळाली १४) किरण लहामटे- अकोले १५) सना मलिक- अणुशक्तीनगर १६) संजय बनसोडे- उदगीर१७) अनिल पाटील- अमळनेर १८) सुनील टिंगरे- वडगाव शेरी ९) अतुल बेनके - जुन्नर २०) संग्राम जगताप- अहमदनगर २१) आशुतोष काळे- कोपरगाव २२) चेतन तुपे- हडपसर २३) सुनील शेळके- मावळ २४) अण्णा बनसोडे- पिंपरी २५) दिलीप मोहिते- खेड आळंदी २६) इंद्रनील नाईक - पुसद २७) नवाब मलिक- शिवाजीनगर मानखुर्द २८) जयसिंह सोळंके- माजलगाव २९) जीशान सिद्धकी- वांद्रे पूर्व ३०) वाई- मकरंद पाटील ३१) तुमसर- राजू कारेमोरे ३२) मोरगाव अर्जुनी- मनोहर चंद्रिकापुरे ३३) वसमत- राजू नवघरे ३४) निफाड- दिलीप बनकर ३५) आष्टी- बाळासाहेब आजबे  ३६) कळवण- नितीन पवार ३७) अहमदपूर - बाबासाहेब पाटील  ३८) मोहोळ - यशवंत माने  ३९) चंदगड - राजेश पाटील यांनाच उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत.


पक्षाला नव्यानं उभारी द्यायची असेल तर नव्या रक्ताला, नव्या पिढीला निवडणुकीच्या राजकारणात आणणं गरजेचं आहे. अजित पवारांच्या संभाव्य यादीवर नजर पाहिल्यास जुन्या जाणत्यांवरच त्यांचा जास्त विश्वास असल्याचं दिसतंय. ही बाब अजित पवारांच्या पक्षवाढीसाठी मारक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांनी काँग्रेस पक्षातून घेतलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर केलीय. पण त्यांच्या पक्षातील नव्या दमाच्या नेत्यांबाबत अजून त्यांनी विचार केलेला दिसत नाही. अजित पवारांनी नव्या रक्ताला वाव न दिल्यास त्याचा वेगळाच संदेश जनमानसात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दादांचा मोहरा काकांच्या गळाला 


माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणेयांनी अखेर घरवापसी केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मी शरद पवार यांच्या सोबतच होतो.  जिल्हा बँकेचे काही काम असल्यामुळे मला अजितदादांसोबत जावं लागलं.असं पक्षप्रवेशानंतर शिंगणे यांनी सांगितलंय.