Maharashtra Vidhan Sabha Election Vidarbha Results 2024 Live Updates :  विधानसभा निवडणूक 2024 प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा मतदार संघातील काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची चौथ्या फेरी अखेर सुद्धा आघाडी करीता संघर्ष करावा लागत आहे. मतदारसंघातून चौथ्या फेरी नंतर नाना पटोले हजारांचा आकडा सुद्धा पार करू शकले नाही.. तर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात सात पैकी 6 ठिकाणीं महायुती आघाडीवर असल्याने नाना पटोले यांचा जादू चालला नाही.


अमरावती जिल्ह्यात महायुतीच्या 8 पैकी 6 जागावर महायुतीचे उमेदवार आघाडीवर


दर्यापूरमध्ये महाविकास आघाडीचे गजानन लवटे आघाडीवर..


अमरावती मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अलीम पटेल मोठ्या मतांनी आघाडीवर 


अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का....


बच्चू कडू व यशोमती ठाकूर मोठ्या फरकाने पिछाडीवर


अकरावी फेरी अखेरीस 


अमरावती अचलपूर मतदार संघात बच्चू कडू यांना मोठा धक्का 


अकराव्या फेरीत अखेर बच्चू कडू 23 हजार मतांनी पिछाडीवर


भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर


 (सकाळी 10 वाजून 30 मिनिटं) 


बडनेरा मतदारसंघ - सातव्या फेरी अखेर महायुतीचे रवी राणा 23000 मतांनी आघाडीवर


प्राथमिक कल: (सकाळी 10 वाजून 15 मिनिटं) 


अमरावती जिल्ह्यात काय स्थिती आहे?


अमरावती - फेरी 6 महायुतीच्या सुलभा खोडके 7190 मतांनी आघाडीवर...


बडनेरा - फेरी 5 युवा स्वाभिमानचे रवी राणा 11304 मतांनी आघाडीवर..


दर्यापूर फेरी 5- ठाकरे गटाचे गजानन लवटे  4885 मतांनी आघाडीवर..


धामणगाव - फेरी 6 भाजपचे प्रताप अडसड 3879 मतांनी आघाडीवर..


मोर्शी - फेरी 4भाजपचे उमेश यावलकर 7659  मतांनी आघाडीवर..


अचलपूर - फेरी 3 री भाजपचे प्रवीण तायडे 6128 आघाडीवर... बच्चू कडू यांना मोठा धक्का बच्चू कडू पिछाडीवर..


मेळघाट - फेरी 4 भाजपचे केवलराम काळे 3400  मतांनी आघाडीवर..


तिवसा - फेरी 1 भाजपचे राजेश वानखेडे 783 मतांनी आघाडीवर...


प्राथमिक कल: (सकाळी 9 वाजून 50 मिनिटं) 


अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघातील चौथ्या फेरी अखेरीस


अमरावती - फेरी 4 महायुतीच्या सुलभा खोडके 3297 मतांनी आघाडीवर...


बडनेरा फेरी  1 युवा स्वाभिमानचे रवी राणा 941 मतांनी आघाडीवर..


दर्यापूर फेरी  1- ठाकरे गटाचे गजानन लवटे 105 मतांनी आघाडीवर..


धामणगाव - फेरी 5 भाजपचे प्रताप अडसड 3100 मतांनी आघाडीवर..


मोर्शी - फेरी 1 भाजपचे उमेश यावलकर 1195 मतांनी आघाडीवर..


अचलपूर - फेरी 2 भाजपचे प्रवीण तायडे 4131आघाडीवर...


मेळघाट - फेरी 2 भाजपचे केवलराम काळे 2300 मतांनी आघाडीवर..


तिवसा - फेरी 1 भाजपचे राजेश वानखेडे 743 मतांनी आघाडीवर...



अमरावती - भाजप उमेदवार राजेश वानखडे 630 मतांनी आघाडीवर


यशोमती ठाकूर 630 मतांनी पिछाडीवर 


यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का


अमरावती -  बच्चू कडू यांना मोठा धक्का...


बच्चू कडू तिसऱ्या फेरीत 6128 मतांनी पिछाडीवर 


तिसऱ्या फेरीत भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर


प्राथमिक कल: (सकाळी 9 वाजून 45 मिनिटं) 


अमरावती - भाजप उमेदवार राजेश वानखडे 630 मतांनी आघाडीवर


यशोमती ठाकूर 630 मतांनी पिछाडीवर 


यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का


प्राथमिक कल: (सकाळी 9 वाजून 45 मिनिटं) 


 


गोंदिया - भाजपचे विनोद अग्रवाल आघाडीवर


उमरेड - पहिल्या फेरीमध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड राखीव मतदार संघात काँग्रेसचे संजय मेश्राम 813 मतांनी आघाडीवर


अहेरी मतदारसंघ- धर्मरावबाबा आत्राम यांना दुसऱ्या फेरीत २२५१ मतांची आघाडी


आरमोरी विधानसभा दुसऱ्या फेरीत भाजपचे कृष्णा गजबे 1476 मतांनी आघाडीवर


दिग्रस मतदारसंघात - तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय राठोड 1075 मतांनी आघाडीवर


अचलपूर मतदार संघात बच्चू कडू पिछाडीवर 


अचलपूर मतदार संघाची दुसरी फेरी पूर्ण 


बच्चू कडू 5008


प्रवीण तायडे 9141


प्रवीण तायडे 4131मतांनी आघाडीवर


धामणगाव विधानसभा मतदार संघ निवडणूक -2024


प्रताप अडसड (भाजपा) - 3726
प्रा. वीरेंद्र जगताप (काॅंग्रेस) - 3766


काँग्रेसचे प्रा. वीरेंद्र जगताप यांना तिसऱ्या फेरीत 40 मतांची आघाडी
  
एकूण 3 फेरीपर्यंत भाजपाचे प्रताप अडसड यांना 1990 मतांची आघाडी


अमरावती अचलपूर मतदारसंघ


प्रहारचे बच्चू कडू 1401 मतांनी पिछाडीवर


भाजपचे प्रवीण तायडे - 3954 


बच्चू कडू  - 2553


प्राथमिक कल: (सकाळी 9 वाजून 01 मिनिटं) 


बडनेरा मतदार संघाची पहिली फेरी पूर्ण 


आमदार रवी राणा पहिल्या फेरीत 685 मतांनी आघाडीवर


ठाकरे गटाच्या बंडखोर प्रीती बंड आणि रवी राणा यांच्या चुरशीची लढत


 प्राथमिक कल: (सकाळी 9 वाजून 01 मिनिटं)  अमरावती विधानसभेचा पहिला कल हाती


अमरावती विधानसभेची पहिली फेरी पूर्ण 


अमरावती मतदार संघातून महायुतीच्या सुलभा खोडके आघाडीवर


अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 4387


काँग्रेसचे सुनील देशमुख 3157


अपक्ष अलीम पटेल 369


भाजपचे बंडखोर जगदीश गुप्ता 1198


1230 मतांनी सुलभा खोडके आघाडीवर


प्राथमिक कल: (सकाळी 8 वाजून 15 मिनिटं) साकोलीमधून नाना पटोले आघाडीवर, चंद्रपूर ब्रह्मपुरी मतदार संघामध्ये विजय वडेट्टीवार आघाडीवर, भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे मतदान कामठीतून आघाडीवर, हिंगणा विधानसभा भाजपचे समीर मेघे आघाडीवर, काटोलमध्ये भाजपाचे उमेदवार चरण सिंग ठाकूर आघाडीवर आहेत. 


प्राथमिक कल: (सकाळी 8 वाजून 30 मिनिटं)  बुलढाण्यातून संजय गायकवाड आघाडीवर आहेत. 


आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुमित वानखेडे आघाडीवर 


हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार आघाडीवर


प्राथमिक कल: (सकाळी 8 वाजून 44 मिनिटं)  पहिल्या फेरीतून बुलढाण्यातून शिंदे शिवसेनेचे संजय गायकवाड 309 मतांनी आघाडीवर


वाशिममधून पहिल्या फेरीअखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉ. सिद्धार्थ आकाराम देवळे 212 मतांनी आघाडीवर


वर्ध्यातून काँग्रेसचे शेखर शेंडे 113 मतांनी आघाडीवर


प्राथमिक कल: (सकाळी 8 वाजून 44 मिनिटं) पुसद मतदारसंघात पहिल्या फेरीत अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक 7000 मतांनी आघाडीवर 


बुलढाणा


मेहकर मतदारसंघात महायुतीचे संजय रायमूलकर पोस्टल मतदान पहिल्या फेरीत 817 मतांनी आघाडीवर.


अकोला पूर्व


पहिल्या फेरीमध्ये अकोला पूर्वमधून भाजपचे रणधीर सावरकर आघाडीवर